देशपातळीवरील ऑलिंपियाड मध्ये एस.पी.स्कूलला 21 सुवर्ण, 24 सिल्वर व 17 ब्राँझपदक...

देशपातळीवरील ऑलिंपियाड मध्ये एस.पी.स्कूलला 21 सुवर्ण, 24 सिल्वर व 17 ब्राँझपदक... 
                                  ई.एच.एफ.फाउंडेशन,नवी दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आलेल्या गणित, विज्ञान व इंग्रजी विषयांच्या ऑलिंपियाड स्पर्धेमध्ये पंढरपूर तालुक्यातील नांदोरे येथील एस.पी. स्कूलच्या विद्यार्थ्यांनी 21 सुवर्ण, 24 सिल्वर व 17 ब्रॉझपदक मिळवून उत्तुंग यश संपादन केले. या स्पर्धेसाठी प्रशालेमधील एकूण 318 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला त्यापैकी 221 विद्यार्थ्यांची द्वितीय लेवलसाठी निवड झाली. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान प्रशालेच्या वतीने करण्यात आला.  यामध्ये नक्ष गादिया, स्वरा कदम, शिवाई पाटील, प्रेमकुमार विभुते, पृथ्वीराज वाघ, श्रद्धा चव्हाण, आनंदी गुळदगड, तनिषा उलभगत, स्मृती वलगे, प्रगती कदम, ज्ञानेश्वर खारे, प्रिया पवार, तृष्णा शिरसाट, अभिजीत देशपांडे, वेदिका उलभगत, उत्कर्ष झुरुळे, आसावरी गायकवाड, अक्षरा व्यवहारे, सार्थक सरवदे, वेदांत वलगे यांनी सुवर्णपदक तर प्रेम बंडलकर, आदित्य कानगुडे, सारा गायकवाड, वल्लभ गायकवाड, पार्थ केचे, वरदराज नाईकनवरे, अभिनव तळेकर, श्रद्धा चव्हाण, श्रेया जिरेकर, आविष्कार पाटील, आर्या बाबर, प्रणव चव्हाण, समर्थ डरंगे, प्रीती जाधव, संस्कार पाटील, श्रेयश  पाटील, तन्वी बाबर, सृष्टी बनसोडे, आरोही उलभगत, अक्षरा व्यवहारे, सिद्धांत भिंगारे यांनी सिल्वरपदक तसेच अधिरा भांगे, प्रिया साळुंखे, स्वरांजली काटवटे, संभवी लांडे, शौर्य सातुरे, अनिरुद्ध गायकवाड, स्वराली गुळदगड, संग्राम पाटील, सिद्धी कुलकर्णी, आर्यन वाघ या विद्यार्थ्यांनी ब्राँझपदक मिळवून यश संपादन केले.                                  सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे मार्गदर्शक डॉ.नंदकुमार होनराव, संस्थापक अध्यक्ष डॉ.संतोष वलगे, सचिव अश्वराज वाघ, सहसचिव बाळासाहेब चव्हाण, खजिनदार विक्रम भिंगारे, प्रकल्प संचालिका वासंती वलगे, मुख्याध्यापिका स्वाती चव्हाण, उपमुख्याध्यापक कुणाल निंबाळकर, माध्यमिक विभाग प्रमुख साईनाथ कुंभार यांनी अभिनंदन केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना माऊली मोकळे, आशिष काशीद, सचिन डोके, विश्वास जवळेकर, गणेश साठे, जोस्ना सुरवसे, अमिना आतार, विद्या पाटील, विमल मोरे, स्विता पांढरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

Previous Post Next Post