श्री दर्लिंग विद्यामंदिर व भास्करआप्पा गायकवाड कनिष्ठ महाविद्यालयाचे यश...!

श्री दर्लिंग विद्यामंदिर व भास्करआप्पा गायकवाड  कनिष्ठ महाविद्यालयाचे यश...! 

पंढरपूर (प्रतिनिधी) :- त्रेपन्नाव्या  जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये  श्री. दर्लिंग विद्यामंदिर व भास्करआप्पा गायकवाड  कनिष्ठ महाविद्यालय चळे ता. पंढरपूर येथील इयत्ता दहावीचा दिव्यांग विद्यार्थी चि. गणेश महादेव निकम  यांनी तयार केलेले अंडी उबवण्याचे यंत्र (Incubater) या  उपकरणाला  जिल्हा स्तरावर  दिव्यांग  माध्यमिक विद्यार्थी गटामध्ये  प्रथम क्रमांक  प्राप्त होऊन या उपकरणाला दोन हजार पाचशे एक रुपये पारितोषिक मिळाले असून या  उपकरणाची राज्यस्तरावर निवड  झाली आहे. 
          त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे  सन्माननीय अध्यक्ष  तथा  कृषी  उत्पन्न  बाजार समिती  सभापती श्री. हरीषदादा गायकवाड, संस्थेचे सचिव श्री. अमोल गायकवाड, प्राचार्य श्री. सुरेश कोळी सर, प्रशालेचे सर्व शिक्षक व कर्मचारी यांचे वतीने अभिनंदन करण्यात आले असून  या उपकरणा साठी जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष श्री. लक्ष्मीप्रसाद  मोहिते सर यांचे बहुमोल मार्गदर्शन  मिळाले. या निवडीबद्दल विद्यार्थी व श्री दर्लिंग विद्यामंदिर व भास्करआप्पा गायकवाड कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post