ज्योतिर्मय योग व निसर्गोपचार केंद्र आयोजत सखी मेळाव्यासाठी स्वराज्य संघटनेची भेट...!

ज्योतिर्मय योग व निसर्गोपचार केंद्र आयोजत सखी मेळाव्यासाठी स्वराज्य संघटनेची भेट...! 

पंढरपूर (प्रतिनिधी) :- ज्योतिर्मय योग व निसर्गोपचार केंद्र आयोजित सखी मेळावा पंढरपूर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. सदर कार्यक्रमाचे आयोजन स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेच्या सोलापूर जिल्हा संघटक डॉ. सौ. ज्योतीताई शेटे मॅडम यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. या मेळाव्यात विविध प्रकारच्या वस्तूंचे तसेच पंढरपूरच्या खास खवय्यांसाठी खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉल्सना पंढरपूरकरांनी मोठ्या प्रमाणात भेट देत कार्यक्रमास उस्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमस्थळी महिलांसह नागरिकांची लक्षणीय उपस्थिती पाहायला मिळाली.
              कार्यक्रमाच्या वेळी नियोजकांच्या वतीने संघटनेतील पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री. कैलास कारंडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत संघटनेचे कार्य कशा प्रकारे चालते, तसेच संघटना कोणकोणत्या सामाजिक व विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे, याबाबत सविस्तर माहिती दिली.
             सदर मेळाव्यास शुभेच्छा देण्यासाठी आणि उपस्थित राहण्यासाठी संघटनेचे अनेक पदाधिकारी कार्यक्रमस्थळी उपस्थित होते. यामध्ये पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री. कैलास कारंडे, सोलापूर जिल्हा संघटक सौ. ज्योतीताई शेटे मॅडम, पंढरपूर तालुका अध्यक्ष प्रवीण सुरवसे, पंढरपूर तालुका उपाध्यक्ष श्री नागेश राहीरकर, पंढरपूर महिला तालुका उपाध्यक्ष सौ. सुवर्णा कुरणावळ, पंढरपूर तालुका सहसचिव श्री लक्ष्मण अभंगराव आणि पंढरपूर तालुका प्रभारी श्री गंगाधर स्वामी यांचा समावेश होता.
           सामाजिक एकोपा, महिलांचे सक्षमीकरण आणि स्थानिक उद्योजकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारा हा सखी मेळावा पंढरपूरकरांसाठी एक सकारात्मक आणि प्रेरणादायी उपक्रम ठरला.

Post a Comment

Previous Post Next Post