पंढरपूरमध्ये ज्योतिर्मय योग व निसर्गोपचार केंद्राच्या माध्यमातून भव्य सखी मेळाव्याचे आयोजन
पंढरपूर (प्रतिनिधी) :- ज्योतिर्मय योग व निसर्गोपचार केंद्राच्या माध्यमातून नुकतेच योग भवानच्या भव्य प्रांगणामध्ये सखी मिळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्याचे उद्घाटन पंढरपूरच्या नूतन नगराध्यक्ष डॉ. सौ. प्रणिताताई भगीरथ भालके यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले.
या कार्यक्रमाला, नूतन नगरसेविका संध्याताई मालोजी शेंबडे, तसेच नूतन नगरसेवक श्री. अमोल डोके यांच्या सुविद्य पत्नी जयश्रीताई अमोल डोके तसेच भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्ष डॉ. प्राजक्ता बेणारे, ज्योतिर्मय निसर्ग उपचार केंद्राच्या अध्यक्षा व भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा शहर अध्यक्ष डॉ. ज्योती अविनाश शेटे हे सर्वजण उपस्थित होते. या सखी मेळाव्याचे आयोजन ज्योतिर्मय निसर्गोपचार केंद्राच्या प्रमुख डॉ. ज्योती शेटे, व त्यांच्या नियोजन मंडळांनी आयोजन केले होते.
यावेळी योग भवनाच्या प्रांगणात खाद्यपदार्थांचे स्टॉल, त्याचबरोबर विविध वस्तू, सौंदर्यप्रसाधने, पर्स, मसाले त्याचबरोबर शोभेच्या वस्तू कपड्यांचे स्टॉल लावलेले होते. आणि ह्यासाठी पंढरपूर आणि परिसरातील नागरिकांचा भव्य प्रतिसाद दिसून आला.
ज्योतिर्मय योग व निसर्गोपचार केंद्राच्या माध्यमातून आयोजित भव्य सखी मेळावा यशस्वी करण्यासाठी डॉ. ज्योती शेटे, सौ. अनुराधा सलगर, सौ. कल्पना कदम, सौ. स्वाती हंकारे, सौ. सीमा काळे, सौ. संध्या कुरणावळ, सौ. सुवर्ण कुरणावळ, सौ. मीनाक्षी जोशी, सौ. पूजा शिंदे, सौ. अनिता खांडेकर, सौ. सुषमा झरकर, सौ. दीपा भट्टड, सौ. सुरेखा ढेरे, सौ. अश्विनी येळे, सौ. गुलताज भयाणी या नियोजन मंडळातील महिलांनी विशेष परिश्रम घेतले.