वामनराव माने प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे कुस्ती स्पर्धेत घवघवीत यश संपादन
भैरवनाथ वाडी येथील वामनराव माने प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयातील पाच मल्लांनी जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला असून त्यांची विभागीय स्तरावर निवड झाली आहे. गत वीस वर्षांपासून या प्रशालेतील मल्लांनी कुस्ती स्पर्धेत कायम दबदबा ठेवत नेत्रदीपक यशाची परंपरा आबादीत ठेवली आहे. १९ वर्षे वयोगटातून शुभम तानाजी हाके ९७ किलोग्रॅम वजन गट, १७ वर्ष वयोगटातून अंकुश विश्वनाथ खतकर ६० किलो ग्रॅम, केदारनाथ नंदकुमार ढोपे ९२ किलोग्रॅम वजन गट, मनोज सतपाल धनगर ८० किलो ग्रॅम वजन गट, या मल्लांनी जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करत विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे. यशस्वी मल्लांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष वामनराव माने, संस्थेचे सचिव तथा जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य सुभाषराव माने, संचालक डॉक्टर प्रतापसिंह माने विजयसिंह माने, प्राचार्य उत्तमराव कोकरे, क्रीडा शिक्षक प्रतापसिंह चव्हाण, एल. एस.
लवटे, नानासो मदने, पैलवान आप्पासो खांडेकर, रंधवा पुजारी, एस.एम.शिवशरण, सुरेश लिंगडे, प्रा.दत्तात्रय सुळ यांनी केले आहे.
