राष्ट्रीय युवा दिनी नालसा डॉन योजनेअंतर्गत शिबीर संपन्न
पंढरपूर, (दि.12):- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण व प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष एम. एस. शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव पी. पी. पेठकर यांच्या सहकार्याने पंढरपूर तालुका विधी सेवा समिती व पंढरपूर अधिवक्ता संघ, पंढरपूर यांचे संयुक्त विद्यमाने सोमवार दि.12 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता सिंहगड अभियांत्रीकी महाविद्यालय, कोर्टी, (ता. पंढरपूर) येथे राष्ट्रीय युवा दिन निमित्त राष्ट्रीय नालसा डॉन योजनेअंतर्गत (ड्रग अवेअरनेस आणि वेलनेस नेव्हिगेशन - ड्रग-फ्री इंडिया योजना-2025 विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी न्यायाधीश श्रीमती एम. बी. कुलकर्णी, यांनी उपस्थीत विद्यार्थ्यांना व्यसनापासून दुर राहून जिद्द व चिकाटीने आयुष्यामध्ये यश मिळविण्याकरीता प्रयत्न करणेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. प्रथम शिबीराची प्रस्ताविका पंढरपूर अधिवक्ता संघाचे अध्यक्ष अॅड. व्ही. एम. भोसले यांनी केली. तसेच पंढरपूर अधिवक्ता संघाचे पदाधिकारी गणेश चव्हाण, राजेंद्र पुजारी, अंकुश वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना कायदेविषयक शिबीरावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास सिंहगड अभियांत्रीकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश जे. कारंडे, उपप्राचार्य डॉ. श्री. स्वानंद जी. कुलकर्णी, अधिवक्ता संघाचे पदाधिकारी, विधी स्वंयसेवक, विद्यार्थी व न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.