ऑस्कर पुरस्कारांचे वितरण
लॉस एंजलिस (वृत्तसेवा) :- संपूर्ण जगातील चित्रपटसृष्टीचे लक्ष लागलेल्या ऑस्कर पुरस्कार वितरण सोहळा थिएटरमध्ये संपन्न झाला. उत्कंठावर्धक वातावरणात रंगलेल्या या सोहळ्यात कोडाने सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून नाव नोंदविले तर सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्काराचा मानकरी विल स्मिथ ठरला. 'ड्यून'ने विविध गटात सहा पुरस्कार पटकाविले. या रंगतदार कार्यक्रमात द आइज ऑफ टॅमी फेय' चित्रपटातील जैसिका चेस्टन हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून गौरविण्यात आले. कलाकारांच्या मूक अभिनयाने सजलेला 'कोडाने उत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळवीत इतिहास रचला. चाइल्ड ऑफ डेफ एडल्ट्स (कोडा) मध्ये एका मूकबधिर कुटुंबाचे चित्रण आहे. यातील ट्रॉय कोटसर या मूक अभिनेत्याला सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर होतात टाळ्यांच्या कडकडाटात प्रेक्षकांनी त्याला उभे राहून मानवंदना दिली. ऑस्कर मिळालेला तो पहिला मूक व्यक्ती आहे.
.jpeg)