कर्मचाऱ्यांना साखरहार व वस्त्र भेट


 सण-उत्सवांचा आनंद सर्वांना मिळावा :- रवि वसंत सोनार


पाडव्यानिमित्त कर्मचाऱ्यांना साखरहार व वस्त्र भेट...!



पंढरपूर (प्रतिनिधी /वार्ताहर /वृत्तसेवा) :- “आपले सर्व सण आणि उत्सव यांचा आनंद आपल्या परिसरातील सर्व परिचितांना मिळावा यासाठी प्रत्येकाने प्रयत्नशील राहिले पाहिजे.” असे मत येथील सामाजिक कार्यकर्ते व विश्वविक्रमवीर कवी रवि वसंत सोनार यांनी व्यक्त केले. ते त्यांच्या जन्मवर्षाच्या सुवर्णमहोत्सवाच्या औचित्याने संकल्पित कला, क्रीडा, साहित्यिक, अध्यात्मिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांच्या संकल्पांतर्गत दहिवाळकर सर्व्हिसिंग सेंटर या त्यांच्या आस्थापनेतील कर्मचाऱ्यांना गुढी पाडव्यानिमित्त  साखरहार व वस्त्र भेट देण्याच्या उपक्रमावेळी बोलत होते. पुढे बोलताना कवी रवि सोनार म्हणाले की - “गुढी पाडव्याच्या निमित्ताने प्रत्येकाच्या घरी आनंदाची गुढी उभी राहिली पाहिजे.”

          गुढी पाडव्याच्या औचित्याने रवि सोनार स्नेह परिवाराच्या वतीने येथील दहिवाळकर सर्व्हिसिंग सेंटरच्या रशीदभाई मुलाणी, गणेश चौधरी तसेच इतर कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना श्री. व सौ. राहूलदादा मोरे, श्री व सौ संतोषभाऊ सर्वगोड या मान्यवरांच्या शुभहस्ते गुढीसाठी साडी व साखरेच्या घाटींचा हार स्नेहभेट स्वरुपात देण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कवी रवि सोनार स्नेह परिवाराच्या वतीने विशेष परिश्रम घेण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post