नागराज मंजुळेचा झुंड बॉक्स ऑफिसवर मागे

प्रसिद्धी झाली कौतुकही झाले पण गल्ला झाला नाही

zund, amitabh bachchan, nagraj manjule, marmik sanwad news

मार्मिक संवाद न्यूज - प्रतिनिधी - पंढरपूर

गेल्या अनेक दिवसांपासून ज्या चित्रपटाची चर्चा सुरू होती, तो नागराज मंजुळे यांचा 'झुंड' गेल्या आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अनेक कलाकारांनी या चित्रपटाचं कौतुक केलं. काहींनी चित्रपटात अनेक गोष्टी कमी असल्याचं म्हटलंय. त्यामुळं हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कशी कमाल दाखवतो, याकडे सर्वांचे डोळे लागले होते.

          महानायक अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट ४ मार्च रोजी सिनेगृहांत प्रदर्शित झाला होता. कोटींची कमाई करत चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर पकड निर्माण केली होती. त्यानंतर  कमाईत घट झाल्याचं दिसून आलं. त्यानंतर विकेंडला कोटींचा गल्ला जमवला. हे आकडे समाधानकारक नसल्याचं अनेकांचे मत आहे. तसेच येत्या आठवड्यात आता झुंडला बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपटांचा सामना करावा लागणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post